मुंबई : मॅगीच्या विक्रीवरील निर्बंध हटवण्याच्या हायकोर्टाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. त्या निकालाच्या विरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात आपील दाखल करणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत दिली.
सार्वजनीक आरोग्यासाठी महाराष्ट्रात मॅगीच्या विक्रीवर १०० टक्के बंदी असायलाच हवी हे आजही राज्यसरकारचे मत असल्याचं ते म्हणाले.
देशात तूरडाळीनं डबल सेंच्युरी गाठल्यानंतर झोपलेल्या सरकारला खडबडून जाग आलीये. सरकारनं राज्यभरात २७० ठिकाणी धाड टाकल्याची माहिती अन्न आणि औषध पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिलीये. मागील २४ तासांत १६ जिल्ह्यांमध्ये २७६ ठिकाणी छापे टाकून डाळीचा अवैध साठा आणि काळाबाजार सुरु आहे का याची तपासणी करण्यात आली.
ज्या डाळींच्या साठ्याची नोंद नसेल किंवा अवैध साठा सापडल्यास त्यावर मोक्का किंवा एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात येईल असा आदेश गिरीश बापट यांनी दिलाय. तसंच नोंद नसलेल्या डाळीचा साठा जप्त करुन त्याचा लिलाव करण्यात येईल, असंही गिरीश बापट यांनी स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.