मुंबई : पोलिस अधिकारी अशोक सादरे यांनी आत्महत्या केली, सुसाईड नोटमध्ये जळगावचे एसपी जालिंदर सुपेकर, पीआय रायते, वाळू माफिया सागर चौधरी यांच्यावर आरोप आहेत, अशोक सादरे यांच्या पत्नीने देखील सुपेकर, रायते आणि वाळू माफिया सागर चौधरीवर आरोप केले आहेत.
अशोक सादरे आत्महत्या प्रकरण मुख्यमंत्र्यांसाठी अवघड जागेचं दुखणं?
सध्या गृह खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे, मात्र या प्रकरणात वाळू माफिया हा सागर चौधरी यांच्या जवळचा असल्याचे फोटो व्हायरल होत असतांना, या प्रकरणाकडे निष्पक्षपणे पाहणे, हे मुख्यमंत्र्यांसाठी अवघड जागेचे दुखणे होणार आहे का? असा देखिल प्रश्न विचारला जात आहे.
एसपी जालिंदर सुपेकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवायला हवं?
या तीन ही जणांवर गुन्हा दाखल झाला असला, तरी पुढील चौकशी निष्पक्ष होऊ शकते का? यावर प्रश्नचिन्ह आहे. या प्रकऱणी एसपी जालिंदर सुपेकर यांना सक्तीच्या रजेवर का पाठवलं जात नाही, असा सवाल देखील केला जात आहे.
गृह खातं सांभाळण्याचा खरा कस लागणार?
मात्र मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असतांना गृह खातं त्यांच्याकडून पेलवलं जातंय का, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या निष्पक्षपणाचा देखील येथे कस लागणार आहे. दिवसेंदिवस या प्रकरणातील आरोप वाढत आहेत, मात्र चौकशी ढिंम्म असल्याचं दिसून येत आहे.
खडसे म्हणतात संबंध नाही, पण फोटोंचं काय?
वाळू माफिया सागर चौधरी आणि आपला काहीही संबंध नसल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे, पण त्यांच्या एका खासगी कार्यक्रमात , तसेच अनेक ठिकाणी सागर त्यांच्या सतत सोबत असल्याचे फोटो व्हाटस अॅपवर व्हायरल होत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्याला सोनेरी एसपी शोभतात का?
जळगावचं स्थानिक दैनिक जनशक्तीने काही महिन्यापूर्वी जळगावचे एसपी, पीआय रायते, वाळू माफिया सागर चौधरी यांच्या सोने हफ्ते म्हणून घेण्या-देण्याच्या बातम्या छापल्या होत्या. त्यावेळी या प्रकरणाला वाचा फुटली असती तर अशोक सादरेंना आत्महत्येची वेळ आली नसती, असं म्हटलं जात आहे.
मात्र प्रश्न असा आहे की, वाळूच्या हफ्त्यांसाठी सोने देण्याचा हा विषय अनेक दिवसांपासून चर्चेत असतांना, गृह खातं हातावर हात धरून का बसलंय, सुपकेर यांच्यावर अजून काहीही कारवाई का झाली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.