मुंबई : भिकारी श्रीमंत असतात, त्यांच्याकडे खूप पैसे असतात, एवढं बोलून आपण भिकारी ते भिकारीचं असं करून दुर्लक्ष करतो, पण या भिकारीच्या संपत्ती पुढे आपण भिकारी असल्याचं आपल्याला दिसून येईल.
तुम्हाला आम्ही ज्या भिकारीबद्दल सांगतोय, त्या भिकाऱ्याकडे एक फ्लॅट ८० लाखांचा आहे, आणि तो दर महिन्याला ७५ हजार रूपये कमवतो.
आश्चर्य वाटू देऊ नका, कारण तुम्ही रात्रंदिवस मेहनत केली तरी एवढी कमाई करू शकत नाहीत, मात्र मुंबईच्या या भिकारीसाठी ही मोठी गोष्ट नाही.
मुंबईतला भारत जैन नावाचा भिकारी आपल्या संपत्तीबद्दल सध्या चर्चेत आहे. भारतातला सर्वात श्रीमंत भिकारी भारत जैन हा मुंबई शहरातील गल्ल्यांमध्ये भीख मागतांना दिसतो. हा व्यक्ती छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा आझाद मैदानजवळ नेहमी भिक मागतांना दिसतो.
भारत जैन काहीही न करता ८ ते १० तासांत २ हजार ते अडीच हजार रूपये कमवतात. त्याची मासिक कमाई ही ७५ हजार रूपये आहे, भारतातल्या कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यालाही एवढा पगार नाही.
एवढंच नाही, यांचं भांडुपमध्ये एक दुकान देखिल आहे, दुकान असलं तरी हे साहेब बाहेर भिक मागत फिरतात आणि आपल्या दुकानाचं १० हजार रूपये भाडं देखिल घेतात. लग्नानंतर यांना दोन मुलं आहेत, एक बारावीत तर दुसरा दहावीत आहे, त्यांचे वडील देखिल ८० लाखांच्या १ बीएचके अपार्टमेंटमध्ये राहतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.