'मोनो' डार्लिंगसाठी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉग!

करी रोड रेल्वे स्थानकाजवळ मोनो रेलसाठी आवश्यक असणाऱ्या कामासाठी मध्य रेल्वे आज मध्यरात्री मेगा ब्लॉक घेणार आहे.

Updated: Sep 5, 2015, 10:23 AM IST
'मोनो' डार्लिंगसाठी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉग! title=

मुंबई : करी रोड रेल्वे स्थानकाजवळ मोनो रेलसाठी आवश्यक असणाऱ्या कामासाठी मध्य रेल्वे आज मध्यरात्री मेगा ब्लॉक घेणार आहे.

रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल. आज रात्री सीएसटीहून कसाऱ्यासाठी शेवटची लोकल रात्री १२.१० वाजता सुटेल. 

ब्लॉकमुळे भायखळा ते परेलदरम्यान वाहतुकीवर याचा परिणाम होईल. मध्य रेल्वेनं काही गाड्या रद्द केल्यात तर काही गाड्यांचं वेळापत्र बदलण्यात आलंय. 

कर्जतहून सीएसटीसाठी सोडण्यात येणारी शेवटची लोकल रात्री १२.२५ मिनिटांनी पोहचेल. ब्लॉकनंतर सीएसटी-अंबरनाथ लोकल सकाळी ५.४८ वाजता सुटेल. 

या ब्लॉकमुळे एक्स्प्रेसच्या वेळापत्रकातही काही प्रमाणात बदल करण्यात आलेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.