मुंबई: एकीकडे आघाडी आणि महायुतीच्या घटस्फोटाची घोषणा करत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली बहुप्रतिक्षित ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर केली. सगळेच पक्ष केवळ आपापला विचार करत असताना आपण तरी महाराष्ट्राचा विचार करुयात, असं म्हणत राज यांनी तब्बल दोन तास राज्याच्या सर्वांगिण विकासाचा आराखडा मांडला.
षण्मुखानंद सभागृहात आयोजित सभारंभात शिक्षण, शेती, शहरे, उद्योग, रोजगार, शासनव्यवस्था, संस्कृती, समाज आणि टोलबाबात आपलं धोरण सादर केलं.
स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही मुलभूत गरजांच्या पलीकडे आपण विचार करू शकलो नाही. प्रगतीला खऱ्या अर्थानं गती मिळाली नाही. ही ब्ल्यू प्रिंट परिपूर्ण नाही. अनेकांनी यापूर्वी असा प्रयत्न केल्याचे सांगून राज्याच्या चिरंतन विकासासाचा हा प्रयत्न असल्याचे राज म्हणाले.
पाहा ही ब्लू प्रिंट
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.