नवी दिल्ली : प्रत्येक आईसाठी तिचा मुलगा काय असतो हे कधी शब्दात वर्णिले जाऊ शकत नाही. तिच्यासाठी तिचे मूल सर्वस्व असते. आपल्या मुलाला ती कधीच दुखी पाहू शकत नाही. म्हणूनच म्हणतात ना 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'.
मुंबईत राहणाऱ्या रिजवान शेख याने आपल्या आईचा फोटो शेअर केला जो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. रिजवान यांच्या आईच्या पायाला नेहमी सूज येत असल्याने पायाचे दुखणे सुरुच असते. मात्र ही आई दररोज गरम पाण्याच्या बादलीत उभे राहून मुलासाठी जेवण बनवते.
आपला मुलगा उपाशी राहू नये म्हणून पायांचे दुखणे सहन करत ही आई त्याच्यासाठी गरमगरम जेवण बनवते. रिकाम्या पोटी आपला मुलगा ऑफिसला जाऊ नये यासाठी त्या आईची धडपड सुरु होते. हे पाहिल्यानंतर खरंच म्हणावेसे आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही.