अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई: कॅन्सल केलेल्या चेकद्वारे काही भामट्यांनी दादरमध्ये एका दाम्पत्याला तब्बल ८० हजारांना फसवलंय. पोलिसांनी या भामट्यांना पकडलंय पण या प्रकारापासून तुम्ही सावध राहा.
बांगड्यांवर आर्टिफिशीअल काम करून संसाराचा गाडा रेटणाऱ्या फर्नांडीस कुटुंबियांची फसवणूक झालीय. फर्नांडीस कुटुंबियांना बँकेचं लोन घ्यायचं होतं. त्यासाठी त्यांच्याकडून कल्पेश तांबे, श्रीमंत भोसले आणि मनोज मित्रा यांनी डेव्हीड फर्नांडीस यांच्याकडून लोनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 3 कॅन्सल चेक घेतले. मात्र या चेकच्या आधारे या तिघांनी फर्नांडीस यांना फसवलं.
विशेष पेन वापरून या तिघांनी फर्नांडीस यांना फसवलंय. या विशिष्ट्य पेनद्वारे त्यांनी चेकवरील Cancelled हे अक्षरं खोडून टाकले. याच तिघांनी ठाणे आणि तुर्भे इथंही अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केली होती.
बँकेतून लोन घेताना व्यवहार करताना सावधान राहा..
# बँकेचे व्यवहार शक्यतो ब्रँचमध्ये जाऊनच करा
# बँकेतून आलोय अशी बतावणी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं ओळखपत्र तपासून पाहा
# संबंधित व्यक्ती ज्या बँकेतून आली असेल त्यांची बँकेकडे चौकशी करा
# पैशांचे व्यवहार वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर करा
# आपण केलेल्या व्यवहारांची वेळोवेळी चौकशी करा
या सोप्या गोष्टी अंमलात आणल्या आणि सावधगिरी बाळगली तर तुमची फसवणूक होणार नाही.
पाहा कशी केली जाते फसवणूक -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.