www.24taas.com,मुंबई
मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. महिलांना प्रवेश नाकारताना सांगितले आहे की, इस्लाममध्ये दर्ग्यातमध्ये महिलांना प्रवेश अस्वीकार आहे.
हाजी अली दर्ग्या ट्रस्टने ही बंदी कायम स्वरूपी आणि अंतिम असल्याचे म्हटले आहे. इस्लाम कायद्यानुसार महिलांना मशिदीत जाण्यावर बंदी आहे. त्यामुळे ही बंदी करण्यात आल्याचे ट्रस्टीने म्हटले आहे. मात्र, दर्ग्याच्या परिसरात महिला येऊ शकतात. परंतु पवित्र कबर ज्या ठिकाणी आहे. त्याठिकाणी जाण्यास त्यांना मज्जाव असेल. १५ व्या शतकातील सुफी संत पीर हाजी अली शाह बुखारी यांची ही कबर आहे.
दर्ग्या कमिटीचे ट्रस्टी रिझवान मर्चंट यांनी म्हटले आहे की, आमच्या भगिनींनी कबरच्या जवळ जाऊ नये. मात्र, त्या प्रार्थना, नमाज करू शकतात. तसेच शाल आणि फुल अर्पण करू शकतील. सहा महिन्यांपूर्वी घोषीत करण्यात आलेल्या बंदीची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, या बंदीला विरोध होत आहे.