मुंबई : मुंबई मेट्रोवर प्रवास करणाऱ्यांसाठी एक तात्पुरता दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई मेट्रोच्या भाववाढीला स्थगिती देण्यात आली आहे.
मुंबई मेट्रोच्या भाड्यात उद्यापासून वाढ होणार होती, मात्र मुंबई मेट्रोच्या या भाववाढीला १७ डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. मेट्रोच्या भाडेवाढीवर १७ डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी असल्याने, ही स्थिगिती देण्यात आली आहे.
मुंबई मेट्रोच्या भाववाढीबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे, मुंबई मेट्रोची भाववाढ ही अव्वाच्या सव्वा असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांची आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.