मुंबई : मुंबईच्या एमएमआरडीए परिसरातल्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी खुषखबर मिळाली आहे. एमएसआरडीसीनं सुमारे 50 हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
मंत्रीमंडळ पायाभूत समितिच्या बैठकीत MSRDC ( महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ) च्या पुढील प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाली
- DPR विस्तृत प्रकल्प आराखडा तयार केला जाणार
- सुमारे 50,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता
- MSRDC हे प्रकल्प करणार ---
- ठाणे घोडबंदर मार्गावर 4 किमीचा उन्नत मार्ग
- ठाणे खाड़ीपुल ( वाशी ) 3 रा पुल
- ठाणे - बोरीवली भुयारी मार्ग
- भिवंडी - कल्याण - शीळ उन्नत मार्ग
- मुंबई नागपुर सुपर कम्युनिकेशन मार्ग
- विदर्भतील 27 रेल्वे उड्डाणपुल
- वाकण-पाली-खोपोली रस्त्याचे चौपदरीकरण
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.