मुंबई : मेट्रोची दरवाढ सध्या तरी टळली आहे, कारण ३१ ऑक्टोबरपर्यंत तिकिट दरांत कोणतीही वाढ होणार नसल्याचं, मेट्रो दरवाढ निश्चिती समितीने स्पष्ट केलं आहे. तिकिटांत कोणतीही वाढ न झाल्याने आता मेट्रोची तिकिटं या आधी होती तशीच म्हणजे, १० रूपये, २० रूपये, ३० रूपये आणि ४० रूपये अशीच राहणार आहे.
मुंबई मेट्रोच्या दरवाढीला यापूर्वी प्रवाशांनी नापसंती दाखवली आहे, तरी देखिल मुंबई मेट्रोची दरवाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, दरवाढ निश्चित करण्यासाठी मेट्रो दरवाढ निश्चिती समिती स्थापन करण्यात आली आहे.
मुंबई मेट्रोची ३१ ऑक्टोबरनंतर दरवाढ झाली, तर मुंबई मेट्रो सुरू झाल्यानंतर ही पहिली दरवाढ असणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.