उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री- पंतप्रधानांवर हल्लाबोल, दिले खुले आव्हान

 दोघांनाही एकदाच निपटून काढतो, अशा कडक शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना थेट हल्लाबोल करत खुले आव्हान दिले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 7, 2017, 09:47 PM IST
उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री- पंतप्रधानांवर हल्लाबोल, दिले खुले आव्हान title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रचारासाठी सामोरे यावे. दोघांनाही एकदाच निपटून काढतो, अशा कडक शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना थेट हल्लाबोल करत खुले आव्हान दिले.

मुख्यमंत्री म्हणतात, पंतप्रधान मोदींआधी माझ्याशी निपटा, असे आव्हान दिले. मुख्यमंत्र्यांनी दिलेले हे आव्हान स्वीकारत उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना एकाचवेळी सामोरे येण्याचे प्रतिआव्हान दिले आहे. मोदींना त्यांच्या स्टेजवर मुंबई पालिका विजयाचे निमंत्रण देणार असे सांगत भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या मतदारसंघात सभा घेत उद्धव ठाकरे यांनी भाजप, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर हल्लाबोल केला.

‘हार्दिक पटेल मातोश्रीवर येऊन गेला. बाळासाहेब ठाकरे आदर्श असल्याने हार्दिक पटेल मातोश्रीवर आला होता. मात्र त्यामुळे काहींच्या पोटात दुखू लागले आहे. अनेकांच्या पोटात गोळा आला आहे, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.

विधानसभेला ज्याप्रकारे सर्व एकत्र आलात. तसेच आताही एकत्र या. सगळ्यांना एकत्र निपटून टाकतो, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी थेट आव्हान दिले. आमच्या पायाखालील वाळू घसरली, अशी टीका करण्याआधी तुमच्या पायाखालचे काय सरकते आहे, ते बघा, असा थेट हल्ला चढवला.

झी २४ तास LIVE अपडेट

20:37 PM   
मुंबई : भाजपच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी झालेले नाही, शिवसेनेने टॅब देत ते कमी केले. टॅबच्या माध्यमातून प्रगत शिक्षण देणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिला महानगरपालिका - उद्धव ठाकरे
20:36 PM   
मुंबई : गेल्या २५ वर्षात मान खाली घालावी लागेल असे काम एकदाही शिवसेनेने केले नाही - उद्धव ठाकरे
20:36 PM   
मुंबई : कॅबिनेटच्या बैठकीत लोकायुक्त बसलाच पाहीजे हा आग्रह यापुढे शिवसेनेचे मंत्री धरणार - उद्धव ठाकरे
20:35 PM   
मुंबई : कल्याण-डोंबिवलीमधील २७ गावांची मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केली, वेगळी नगरपालिका तयार करण्याचं आश्वासनावरून मुख्यमंत्र्यांनी पलटी मारली - उद्धव ठाकरे
20:35 PM   
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना गलिच्छ राजकारण पुढे आणत असाल तर त्याला मी देखील तयार आहे, तुम्ही काय केले हे आधी सांगा आणि नंतर पारदर्शकतेबाबत बोला - उद्धव ठाकरे
20:27 PM   
मुंबई : मुंबईतील नरेंद्र मोदींच्या सभेत शिवसैनिक मोदींना शिवसेनेच्या विजय सभेचं आमंत्रण देणार - उद्धव ठाकरे
20:23 PM   
मुंबई : असं म्हणतात की भाजपच्या जाहीरनाम्यावर स्टँप पेपर टाकलाय, ही गरज का आली, का मोदींचा फोटो वापरला नाही ? - उद्धव ठाकरे
20:23 PM   
मुंबई : अनेकांना वाटतं की फोटो म्हणजे तेलगीचा स्टँप पेपर - उद्धव ठाकरे
20:23 PM   
मुंबई : शिवसेनाप्रमुखांचा चेहरा, शिवसेनेचं वचन हेच स्टँप पेपरपेक्षा महत्वाचं आहे - उद्धव ठाकरे
20:22 PM   
मुंबई : शिवसेनाप्रमुखांना वंदन करून वचननामा मुंबईकरांसमोर ठेवला - उद्धव ठाकरे
20:22 PM   
मुंबई : आतापर्यंत आयता जाहीरनामा मिळत होता, मात्र मुंबईची माहिती नाही त्यामुळे लोकांकडून मदत मागायला लागले - उद्धव ठाकरे
20:22 PM   
मुंबई : अंगावर येत असताना मुख्यमंत्रीसाहेब कारभाराकडे पण लक्ष द्या - उद्धव ठाकरे
20:22 PM   
मुंबई : वनमंत्र्यांच्या मतदारसंघात वाळूमाफियांनी वनअधिकाऱ्याला मारहाण केली,याला उत्तर कोण देणार - उद्धव ठाकरे
२०:22 PM   
मुंबई : मी अभिमानाने सांगेन की उमेदवारांनी अर्ज भरण्याआधी २३ जानेवारीला वचननामा प्रकाशित केला - उद्धव ठाकरे 
20:19 PM   
मुंबई : जसे विधानसभेत आला होतात तसेच सगळे एकदम अंगावर या, सगळ्यांना एकदम निपटून टाकतो - उद्धव ठाकरे 
20:18 PM   
मुंबई : नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस दोघांनाही निपटून टाकणार, हार्दिक पटेल कुठलीही युती करण्यासाठी आला नव्हता - उद्धव ठाकरे