मुंबई: मुंबई पोलिसांमधला क्रूर चेहरा दाखवणारी... अंधेरी पोलीस स्टेशनसमोर खाजगीत भांडणाऱ्या एका जोडप्याला पोलिसांनी केलेल्या निर्दयी मारहाणीचा व्हिडिओ झी माडियाच्या हाती आलाय. एका एनजीओनं पोलिसांची ही निर्दयी मारहाण मोबाईल कॅमेरात कैद केला.
व्हिडीओमध्ये जोडपं पोलिसांची वारंवार माफी मागताना दिसतंय. आम्ही एका प्रतिष्ठीत कंपनीत काम करतो.. आमचं खासगी भांडणं आहे... त्यामुळे आम्हाला माफ करा आणि सोडा अशी विनवणी करतयं. पण पोलीस उलट त्या मुलगा आणि मुलीची उलट तपासणी करतायत. त्यानंतर दोघांनाही वेगळं करून त्यांना मारहाण करण्यात येत असल्याचं दिसतंय.
दरम्यान पोलिसांनी कॅमेरावर बोलण्यास नकार दिलाय. पण जोडपं नशेमध्ये आरडाओरड करत असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
पाहा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.