मुंबई : युतीतील जागा वाटपाबाबतचं घोडं अजून गंगेत न्हाहत नसताना आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कायम. काँग्रेसने इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेत काँग्रेसला अल्टिमेटम दिला आहे. आज रात्री काय तो निर्णय घ्या, अन्यथा आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत, असे राष्ट्रवादीचे नेत प्रफुल्ल पवार यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी संकटात असल्याचे संकेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले होते. काँग्रेसच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची आज रात्री १० वाजेपर्यंत वाट बघणार असल्याचे ठाकरे म्हणाले. काँग्रेसची १७४ जणांची यादी तयार आहे तर २८८ नावं तयार असल्याचेही ठाकरे म्हणाले. त्यानंतर राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसलाच अल्टिमेटम दिला.
पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
- आघाडी टिकवण्याची आमची इच्छा आहे.
- १२४ पेक्षा जास्त जागा देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने उद्याच द्यावा.
- अन्यथा वेगळा विचार करण्याचे संकेत.
- महायुतीची चर्चा सुरू आहे आणि ती सकारात्मक असल्याचं समजतं. - त्यामुळे एक ते दोन दिवसात अनेक गोष्टी कराव्या लागणार असल्याने काँग्रेसनेच उद्या प्रस्ताव द्यावा अशी विनंती आपण करणार
- अजून किती दिवस वाट बघायची
- आमच्या मागणीवर काँग्रेसने काही विचार केला आहे असं दिसत नाही.
- १४४ जागा ही आमची मागणी आहे.
- १२४ जागा २००४मध्येही होत्या, त्यामुळे १२४ जागा या वाढीव म्हणता येत नाहीत
- आता परिस्थिती बदलली आहे आणि जास्त जागांची भूमिका स्पष्ट केली आहे
- राष्ट्रवादीने वाटाघाटी करण्याचाही प्रयत्न केलाय.
- लोकसभेच्या निवडणुकांमध्येही विधानसभा क्षेत्रांमध्ये राष्ट्रवादीला लीड आहे. याचा विचार व्हावा.
- २००४मध्ये काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकूनही संयमी भूमिका घेतली.
- जास्त जागा जिंकूनही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला नाही.
- याआधीही कमी जागा स्वीकारणं आम्हाला पसंत नव्हतं, परंतु धर्मनिरपेक्ष सरकारसाठी व आघाडी धर्मासाठी आम्ही कमी जागा स्वीकारल्या
- राष्ट्रवादी काँग्रेसचा जास्त जागा लढवण्याचा आमचा आग्रह आहे. तशी कार्यकर्त्यांची मागणीही आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.