मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर अवजड वाहनांना सुट्टीच्या कालावधीत ठराविक वेळेत प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडीवरील उपाययोजनेचा भाग म्हणून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तीन एक्सल, मल्टी एक्सल आणि ओडीसी वाहनांना सुट्टीच्या आदल्या दिवशी आणि सुट्टीच्या दिवशी अशा अवजड वाहनांना ठरविक वेळेत द्रुतगती मार्गावर जाण्यास अधिसूचनेद्वारे प्रवेश बंदी करण्यात आली होती.
द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यापुढेही या वाहनांना अधिसूचनेद्वारे बंदी करण्यात आली आहे.