मुंबई : पेट्रोलपंप वितरकांनी त्यांचं आंदोलन तुर्तास मागे घेतले आहे, तेल वितरक आणि पेट्रोलपंप वितरकांच्या बैठकीत हा निर्णय झाला. आंदोलन तुर्तास मागे घेतल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. कारण राज्यातील अनेक शहरात सकाळपासून पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या.
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबईसह देशभरातील पेट्रोलियम वितरक दुसऱ्या दिवशी संपावर होते, त्यामुळे आज दुपारपर्यंत मुंबईतील 250 पेट्रोलपंपांपैकी बहुतांश पेट्रोल पंपांतील इंधनसाठा संपण्याची शक्यता होती, मात्र आता आंदोलन मागे घेतल्याने ही शक्यता संपुष्टात आली आहे.
दरम्यान या परिस्थितीत तिन्ही सार्वजनिक तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि पेट्रोल डिलर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यात सकारात्मक मार्ग निघाला आहे, यानंतर इंधन खरेदीवरील बहिष्कार मागे घेण्यात आला आहे.