'नोटाबंदीचा आता त्रास मात्र भविष्यात फायदा'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पनवेलमधील पाताळगंगा येथी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्सचं(एनआयएसएम) उद्घाटन केलं. या उद्घाटनाप्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी नोटाबंदीचा पुन्हा उल्लेख केला.

Updated: Dec 24, 2016, 01:29 PM IST
'नोटाबंदीचा आता त्रास मात्र भविष्यात फायदा'

पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पनवेलमधील पाताळगंगा येथी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्सचं(एनआयएसएम) उद्घाटन केलं. या उद्घाटनाप्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी नोटाबंदीचा पुन्हा उल्लेख केला.

नोटाबंदी लागू केल्यामुळे आता जनतेला त्रासाला सामोरे जावे लागतेय, मात्र भविष्यात या निर्णयाचा आपल्याला फायदा होणार आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागले तरी त्यासाठी मागेपुढे पाहणार नाही. विरोधक आधी टीका करत होते मात्र त्यांनीही विकासकामाचे कौतुक केलेय,  असे मोदींनी यावेळी सांगितले.

त्याचप्रमाणे लवकरच जीएसटी कायदा लागू करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आमचे सरकार दूरदृष्टीचे निर्णय घेत आहे. कौशल्यविकासावर आमचा अधिक भर आहे. विदेशी चलनाचे प्रमाण वाढतंय, असंही मोदींनी आपल्या भाषणात म्हटलंय.