मुंबई: वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील पारसकर आणि त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी मॉडेल यांच्या वादात आता नवी एन्ट्री घेतलीय, ती वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे हिनं... पारसकर आणि त्या मॉडेलमधील ई मेलचे पुरावेही झी मीडियाच्या हाती आलेत...
कहाणीमध्ये नवा ट्विस्ट आलाय... सुनील पारसकर विरूद्ध मॉडेल यांच्यातील वादामध्ये आता चक्क पूनम पांडेची एन्ट्री झालीय... आता पूनम पांडे कोण, याची वेगळी ओळख करून देण्याची गरजच नाही... पारसकरांनी पूनम पांडेसाठी मला फसवलं, माझं आयुष्य उद्धवस्त केलं, असा आरोप बलात्काराची तक्रार करणाऱ्या मॉडेलनं केलाय. पूनम पांडे आणि त्या मॉडेलमध्ये वैर होतं आणि त्यासाठीच पारसकरांनी माझा छळ केला, असं त्या मॉडेलनं पोलिसांना सांगितलंय. याचा पुरावा म्हणून त्या मॉडेलनं दोघांमधील ई-मेल पोलिसांना दिलेत.
झी 24 तासच्या हाती लागलेल्या त्या ईमेलमध्ये काय दडलंय, ते पाहूयात...
1) 31 मार्च 2014 ला त्या मॉडेलनं रात्री 10 वाजता पारसकरांना मेल पाठवला.
दर्जाच नाही... ती धड बोलू शकत नाही की साधी कॉपीही नीट करू शकत नाही. 29 तारखेला मी माझा फोटो एका कोटसह ट्विट केला... 9 तासांनी तिनं माझा सेम कोट वापरून आपला चीप फोटो ट्विटरवर टाकला... आणि तुम्ही त्या CHEAP पणाचं कौतुक करता... LOVE U FOR THAT...
2) या मेलला 1 एप्रिल 2014 ला पारसकरांनी काय उत्तर दिलं ते पाहा...
मी शपथ घेतो... मी कधीच तिला पाहिलं नाही, तिला भेटलो नाही, तिचं कौतुक केलं नाही. ती कोण आहे आणि काय ट्विट करते, याच्याशी मला काहीचं देणंघेणं नाही. माझ्यावर विश्वास ठेव... प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस...
3) सुनील पारसकरांनी 27 जून 2014 रोजी त्या मॉडेलला एक दोन नव्हे, चार ईमेल पाठवले....
डिअर, तू फ्रेंड होतीस, आहेस आणि कायम राहशील. अगदी तू माझ्याविरूद्ध गेलीस तरीही... तू माझ्यावर नोटीस काढू शकतेस. मीडियामध्ये जाऊ शकतेस. पोलीस आयुक्तांकडे तक्रार करून शकते. कुणाकडेही जाऊ शकतेस. पण कुणीतरी जाणीवपूर्वक तुला भडकावण्याचा प्रयत्न करतंय.. मी खोटं बोलत असेन तर तुझ्या आईची बददुआ मला लागेल....
4) पुढच्या मेलमध्ये ते लिहितात....
मी शपथ घेऊन सांगतो की, तू आणि पूनम पांडे पब्लिसिटीसाठी काहीही कराल. अगदी कपडेही काढाल. आता तुझे रंग मला दिसतायत... मीडियात जाऊन ड्रामा करण्याची गरज नाही.
5) या मेलवर ती मॉडेल चांगलीच संतापली...
तुम्ही माझं आयुष्य उद्धवस्त केलंय. कधी मदत तर केली नाहीच. यापूर्वीही तुम्ही मुलाच्या नावानं शपथा घेतल्यात. त्यामुळं माझ्या आईच्या नावानं खोटी शपथ घेऊ नका. आता काय करायचंय, ते मी ठरवलंय.
6) त्यानंतर पारसकरांनी पुन्हा तिला मेल पाठवला...
ठीक आहे, मी तुला त्रास देणार नाही. मी ड्रामा करत नाहीय. जेव्हा तुला सत्य समजून घ्यायचं असेल तेव्हा मला येऊन भेट...
7) 27 जूनच्या पारसकरांच्या शेवटच्या मेलला त्या मॉडेलनं 28 जूनला सकाळी उत्तर दिलं...
तुम्ही किती मोठे अभिनेते आहात, ते मी जगाला दाखवून देईन. कसं रडता, कशा धमक्या देता, कशी दया मागता, कशी पार्टी करता, कशी व्हिडिओ शुटिंग काढता, रात्रभर कसे व्हॉट्सअपवर असता आणि पुन्हा बायपास सर्जरी झालेला म्हातारा माणूस असल्याचं नाटक करता...
8) त्या मेलला पारसकरांनी त्याचदिवशी उत्तर दिंल...
यापुढं मी तुझ्याशी कसलंही कम्युनिकेशन करणार नाही. तुझे सर्व मेसेज मी डिलीट करतोय. एकच सांगतो मी तुझ्याबद्दल कुणाशीही बोललो नाही आणि पूनम पांडेला मी ओळखतही नाही...
9) पुढच्या 15 मिनिटांतच त्या मॉडेलचा पुन्हा मेल आला...
कोणी काय केलं, मला सगळं माहित आहे. माझ्याकडे भरपूर व्हिडिओ क्लिप्स आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेली तर मी त्या क्लिप्स न्यूज चॅनेल्सना देईन... एन्जॉय..
मात्र त्यानंतरही या दोघांमध्ये आणखी काही काळ ई मेलद्वारे कम्युनिकेशन सुरूच होतं. आणि शेवटी हे प्रकरण क्राईम ब्रँचपर्यंत पोहोचलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.