मुंबई : राज्य सरकारने ९ तारखेला दिलेला आदेश स्थगित केला आहे. खासगी रूग्णालयांना जुन्या ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्विकारण्यास सांगितले होते. परंतु या आदेशाला आज राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे खासगी रूग्णालयांना जुन्या नोटा स्विकारता येणार नाही.