मुंबई : महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युतीविषयी अजून कोणतीही स्पष्टता आलेली नसली तरी उमेदवारांसाठी मोठी चुरस पाहालया मिळत आहे. मराठी भाषिकांचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये कोणाचा झेंडा फडकणार. यंदाही मनसे दादरमध्ये करिष्मा दाखवणार का याची उत्सुकता ताणली गेली आहे.
युती होण्यापूर्वीच्या समीकरणांनुसार या ठिकाणी शिवसेनेकडून मनोहर जोशी समर्थक पुन्हा सक्रीय झाले आहेत. तर दोन माजी महापौरांची नावे चर्चेत आहेत. यात मिलिंद वैद्य आणि विशाखा राऊत यांच्या नावांची चर्चा आहे.
तर शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर आणि नुकतेच आणि शिवसेनेतून भाजपात गेलेले सुरेश गंभीर यांची कन्या शीतल गंभीर- देसाई हे देखील इच्छुक आहेत.
मनसेचे विद्यमान नगरसेवक संदीप देशपांडे, संतोष धुरी सीमा शिवलकर यांची नावे चर्चेत आहेत. याबरोबरच मनसे नगरसेवकांच्या पत्नींनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये विरेन तांडेल यांची पत्नी भारती तांडेल, सुधीर जाधव यांची पत्नी स्नेहल जाधव ( २ टर्म नगरसेविका ) संदीप देशपांडे यांच्या पत्नि स्वप्ना देशपांडे यांचा समावेश आहे.
वॉर्ड क्रमांक 182
शिवसेना- मिलिंद वैद्य (माजी महापौर)
मनसे- संदीप देशपांडे, श्रद्धा पाटील, राजन पारकर
भाजप- विलास आंबेकर, महेश धननेहेर, प्रशांत पळ
वॉर्ड क्रमांक वॉर्ड १९०
मनसे- भारती तांडेल
भाजप- शीतल गंभीर देसाई, राजश्री शिरवाडकर
वॉर्ड क्रमांक वॉर्ड १९१
शिवसेना- विशाखा राऊत, दिपाली साने, आरती किनेर
मनसे- स्वप्ना देशपांडे
भाजप- उल्का ठाकूर, अक्षता तेंडुलकर, मनस्वी शिवलकर
वॉर्ड क्रमांक वॉर्ड १९२
शिवसेना- सायली विचले, स्वाती पाटणकर
मनसे- स्नेहल जाधव
भाजप- वैभवी भाटकर, अक्षता तेंडुलकर
वॉर्ड क्रमांक १९४
शिवसेना- समाधान सरवणकर, महेश सावंत
मनसे- संतोश धुरी
भाजप- संदेश जाधव, सु्र्यकांत धावले
वॉर्ड क्रमांक १९३
शिवसेना- हेमांगी वरळीकर
मनसे- सीमा शिवलकर
भाजप- राजेंद्र डेरवणकर, जयंत नटे