मुंबई : 'राज की बात' या वादग्रस्त व्हिडिओमुळे वादात सापडलेले भाजप आमदार राज पुरोहित यांनी आपली बाजु सावरण्यासाठी खुलासा केलाय. दाखवण्यात येणारं तथाकथित स्टिंग ऑपरेशन आणि सीडी, यात कसलंही तथ्य नसल्याचा दावा राज पुरोहित यांनी केलाय.
या 'स्टिंग ऑपरेशन'च्या सीडीची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दाखवण्यात येणाऱ्या सीडीला कोणतंही अधिकृत प्रमाण नसल्यानं, आपण ते नाकारत असल्याचं राज पुरोहित यांनी म्हटलंय.
एव्हढचं नाही तर, भाजपच्या स्वच्छ प्रतिमेला नुकसान पोहोचवण्याचा हा विरोधकांचा खोडसाळपणा असल्याचंही राज पुरोहित म्हणतायत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.