मुंबई : मंत्री म्हटला म्हणजे कार्यकर्त्ये, समस्या घेऊन आलेली जनता, अधिकाऱ्यांचा लवाजमा यांच्याच गराड्यात असलेलं चित्र सर्वांच्या मनात असतं....आणि ते स्वाभाविकच आहे. मात्र राज्यातला एक मंत्री या सर्वांपासून सध्या फारच दूर असून चक्क अभ्यासात मग्न आहे.
वाटलं ना आश्चर्य... राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पीएचडी करायचं ठरवलं असून ते सध्या पीएचडीच्या प्रवेश परीक्षेत व्यस्त आहेत. त्यांनी दोन पेपर दिले असून तिसऱ्या पेपरची बडोले जोरदार तयारी करत आहेत.
बडोले यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर पीएचडी करायचा मानस आहे. परीक्षेबाबत बोलताना आधीचे दोन पेपर्स चांगले गेल्याचं समाधान त्यांना लपवता येत नव्हतं...
बडोले त्यांच्या एवढ्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत अभ्यास करून परीक्षा देत असल्यानं विद्यार्थ्यांसह सर्वांसाठीच हे प्रेरणादायी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.