www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
सारस्वत बॅंकेत नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. बॅंकेमध्ये नव्याने १००० पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला मुंबईतील प्रभादेवी येथील बॅंकेच्या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल. अथवा तुम्ही ऑनलाईनही अर्ज करू शकता.
सारस्वत बॅंकेमध्ये क्लर्क, कनिष्ठ अधिकारी तसेच उपव्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता पधवीधर आहे. मात्र, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा विद्यार्थी असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवारा फस्टक्लास हवा आणि वय मर्यादा २७ अशी ठेवण्यात आलेय. अधिक माहितीसाठी तुम्ही http://www.saraswatbank.com या बॅंकेच्या संकेतस्थळावर लॉगऑन करा.
सहा नियोजित शाखांमध्ये ही भरती करण्यात येणार आहे. कर्नाटक, मध्यप्रदेशातील इंदूर, महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि नवी दिल्ली या ठिकाणी सारस्वत बॅंकेच्या शाखा आहेत. प्रत्येक राज्यातील मातृभाषेला प्राधान्य देण्यात आले आहे. शिवाय इंग्रजी आणि हिंदी भाषा अवगत हवी, अशी अटही घालण्यात आली आहे.
पात्रता निकष – उमेदवाराचे १ जून २०१३ पर्यंत ३० वर्षे असावे. किमान प्रथम श्रेणीत उमेदवार उत्तीर्ण असावा. B.Com. / B.Sc. मान्यताप्राप्त विद्यापीठातून तर JAIIB / CAIIB असणाऱ्या उमेदवार प्राधान्य दिले जाणारआहे. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक, खासगी क्षेत्रातील बँक किंवा लिपिक म्हणून कामाचा किमान ३ वर्ष अनुभव असावा. तर बँक प्रतिनिधी, व्यवस्थापक, मार्केटिंगसाठी १ जून, २०१३ रोजी ३५ वर्षांखालील उमेदवार असावा. उमेदवार किमान प्रथम श्रेणीत B.Com. / B.Sc. मान्यताप्राप्त विद्यापीठातून उतीर्ण असावा किंवा CAIIB सह उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक, खासगी क्षेत्रातील बँक ऑफिसर म्हणून कामाचा किमान ३ वर्ष अनुभव असावा.
पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज पाठवू शकतील. सिलबंद अर्ज कोणत्या पोस्टसाठी आहे. त्याचा उल्लेख करून तो अर्ज सहकारी बँक लि (शेड्यूल्ड बँक), सारस्वत बँक भवन, प्लॉट क्र ९५३, आप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५ या पत्तावर पाठवू शकता. किंवा वेबसाइट http://www.saraswatbank.com करू शकता, असे बॅंकेने म्हटले आहे. अधिक माहितीसाठी ०२२- ६६००५५५५ यावर माहिती घेऊ शकता.
*इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
*झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.