www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यासह देशात निवडणुकीचं वारं वाहू लागलंय. सर्वाधिक मतदार तरुण असल्यानं तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झालीय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे म्हणजे शिवसेनेचा तरुण चेहरा. आदित्य ठाकरे यांच्या अध्यतेखाली युवा सेनेचं कामकाज सुरू आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तरुणांना आकर्षित करण्याची जबाबदारी युवासेनेची देखील असणार आहे.
त्यासाठी युवा सेना आता कामाला लागलीय. त्याचाच एक भाग म्हणून युवा सेना आता युपीएससी आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासची मोफत सुविधा पुरवणारेय. त्यासाठी युवा सेनेकडून राज्यभरातल्या १४ केंद्रांमध्ये एक पूर्वपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला सहा हजार विद्यार्थी बसले होते. ही परिक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परिक्षेचा कोचिंग क्लासचा एका वर्षाचा खर्च युवा सेना उचलणार आहे.
तरुणांच्या भवितव्यासाठी युवा सेनेनं हाती घेतलेला उपक्रम स्वागतार्हच आहे. मात्र युवासेनेनं महापालिका शाळेत विद्यार्थी घडावेत यासाठी दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.