मुंबई : राज्याचे नवीन महाधिवक्ता म्हणून रोहित देव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. श्रीहरी अणेंच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होतं.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देव यांचं नाव निश्चित झालं आहे. अणेंच्या राजीनाम्यानंतर सरकारनं देव यांचीच प्रभारी महाधिकवक्ता म्हणून नेमणूक केली होती. नागपूरचेच असलेले देव हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात.