सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांशी थेट साधला संवाद

पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सकाळी दादर इथे शेतमाल घेऊन येणा-या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. आज सकाळी 300 ट्रक राज्यातल्या विविध भागातून मुंबईत दाखल झाले. व्यापा-यांच्या कुठल्याही मदतीशिवाय शेतकरी स्वतः हे ट्रक मुंबईत घेऊन आलेत..त्यामुळं ग्राहकांशी त्यांना थेट माल विकता आला. विशेष या सर्व ट्रकला राज्यभरात टोलमुक्ती करण्यात आल्याचं पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

Updated: Jul 12, 2016, 08:21 AM IST
सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांशी थेट साधला संवाद

मुंबई : पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सकाळी दादर इथे शेतमाल घेऊन येणा-या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. आज सकाळी 300 ट्रक राज्यातल्या विविध भागातून मुंबईत दाखल झाले. व्यापा-यांच्या कुठल्याही मदतीशिवाय शेतकरी स्वतः हे ट्रक मुंबईत घेऊन आलेत..त्यामुळं ग्राहकांशी त्यांना थेट माल विकता आला. विशेष या सर्व ट्रकला राज्यभरात टोलमुक्ती करण्यात आल्याचं पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

एपीएमसीतून भाजीपाला मुक्तीचा अधिनियम अस्तित्वात आल्यानं राज्यभरतल्या बाजार समित्यांमधले व्यापारी संपावर गेलेत.  त्यावर तोडगा काढण्यासाठी यावर उद्या पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघाला नाहीतर कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल असं खोत यांनी सांगितलं...दरम्यान शेतक-यांनी थेट माल विकता येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय.