मुंबई : सैराट सिनेमातील खोखोचा डायलॉग आणि भाजप-शिवसेनेच्या सध्याच्या स्थितीवर व्हॉटसअॅपवर वापरण्यात येतोय, मनोरंजन म्हणून का असेना कार्यकर्त्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
ही धुसफूस मुंबई महापालिका निवडणूक जवळ आल्याने सुरू झाल्याचं बोललं जात आहे, पण सर्वात महत्वाचं म्हणजे, मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणेच तर होणार नाही ना?
कारण सैराटमधील प्रदीप बनसोडेचा नखांचा सिन मुंबई महापालिकेच्या राजकारणात रिपीट तर होणार नाही ना?, कारण एक मित्र पक्ष प्रदीप बनसोडेसारखा प्रतिक्षा करत बसेल, आणि शेवटी प्रस्तावाच्या जागी हातात नखं तर येणार नाहीत ना?
सैराटचा खो-खोचा डायलॉग सध्याच्या स्थितीवर चपलख बसतो, असं म्हटलं जात असलं, तरी मुंबई मनपाच्या राजकारणात सैराटमधील नखांचा सिन आला, तर प्रदीप कोणता पक्ष ठरेल हे योग्य वेळीच स्पष्ट होणार आहे.