न्यायालयाबाहेर सलमानच्या चाहत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

अभिनेता सलमान खान याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाबाहेर सलमानच्या एका चाहत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

Updated: May 8, 2015, 02:49 PM IST
न्यायालयाबाहेर सलमानच्या चाहत्याचा आत्महत्येचा प्रयत्न  title=

मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाबाहेर सलमानच्या एका चाहत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

सलमानला अटक झालेली मला बघायचे नाही, असे म्हणत या चाहत्याने न्यायालय परिसरात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर कडेकोड पोलीस बंदोबस्त असल्याने पोलिसांनी त्याला त्वरित ताब्यात घेतले.

दरम्यान, चाहत्याची प्रकृती ठीक असल्याचे समजते. न्यायालयाबाहेर तोबा गर्दी होती. चाहत्यांसोबतच सलमानच्या विरोधात त्याच्या लोकप्रीयतेचा निकषाला दुर्लक्ष करून सलमानवर इतर दोषींप्रमाणेच कारवाई व्हावी, अशा मागणीची निदर्शने करणाऱ्यांची गर्दी झाली होती..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.