'सामना'वर बंदीवर असं काही बोलले संजय राऊत

 भाजप-शिवसेनेच्या वादाचा आणखी एक सामना रंगलाय....शिवसेनेचे मुखपत्र सामनावर तीन दिवस बंदी घालण्याची मागणी भाजपनं राज्य निवडणूक आयोगाकडे केलीय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 15, 2017, 08:12 PM IST
'सामना'वर बंदीवर असं काही बोलले संजय राऊत

मुंबई :  भाजप-शिवसेनेच्या वादाचा आणखी एक सामना रंगलाय....शिवसेनेचे मुखपत्र सामनावर तीन दिवस बंदी घालण्याची मागणी भाजपनं राज्य निवडणूक आयोगाकडे केलीय. 

 
 यासंदर्भात भाजपनं पत्र पाठवलंय. सामनामधील वृत्तांमुळं आचारसंहितेचा भंग होत असल्याचा दावा भाजपनं केलाय. 16, 20 आणि 21 फेब्रुवारीला सामना छापण्यावर बंदी घालण्याची मागणी भाजपनं केलीय. 
 
 या मागणीवर शिवसेनेनं टीका केलीय. 
 
 आजपर्यंत सामनावर बंदी घालण्याची मागणी पाकिस्तानमधून होत होती.  सामना हा  देशाच्या शत्रूंचा शत्रू आहे.  सामना'वर बंदी आणा अशी मागणी एमआयएम सारख्या धर्मांध शक्ती करत होत्या  मात्र आता घाबरलेल्या आमच्या मित्रांकडूनच ही मागणी होत आहे. त्यामुळं त्यांची डीएनए चाचणी करावी लागेल असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावलाय.  आता त्यांच्यासाठी आम्हांला ब्लड डोनेशन कॅम्प घ्यावा लागेल.