www.24taas.com, मुंबई
फेरीवाला धोरणाला शिवसेना-मनसेनं विरोध केलाय. फेरीवाला धोरणाविरोधात सभागृहात मनसेन मुंबई महापालिका सभागृहात बॅनर्स फडकावून विरोध केला. या धोरणामुळे मुंबई बकाल होईल, असा दावा महापौर सुनील प्रभूंनी केला.
या विधेयकानुसार शहरातल्या लोकसंख्येच्या 2.5 टक्के या प्रमाणात फेरीवाल्यांना लायसन्स देण्यात येणार आहेत. शहरातल्या ठराविक भागांमध्ये फेरीवाला झोन घोषित करण्यात येतील आणि विशेष म्हणजे या दोन गोष्टींची अंमलबजावणी होत नाही. तोपर्यंत महापालिका आणि पोलिसांना फेरीवाल्यांवर कारवाई करता येणार नाही. यामुळं साहजिकच मुंबईतल्या अनधिकृत फेरीवाल्यांना अभय मिळणाराय. तसंच परप्रांतियांनाही सहज लायसन मिळू शकणार आहे.केंन्द्राच्या फेरीवाला धोरणान मुंबईकराच्या उरावर भैया उरावर बसेल अशी बॅनर्स फडकावून मनसेन विरोध केलायं.
तर शिवसेना स्टाईलन फेरीवाला धोरणाला विरोध करू अस इशारा मुंबईच्या महापौरांनी दिला. तर कॉग्रेस - राष्ट्रवादीने फेरीवाला धोरणाने अडीच लाख फेरीवाल्याच पुर्नवसन होईल.त्यामुळे पालिकेचा महसूल प्राप्त होईल.यासाठी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी कॉग्रेस - राष्ट्रवादीन केलीयं.