मृत्यूनंतरही शेतक-यांच्या नेत्याची तळमळ कायम

नेता कसा असावा याची प्रचिती शरद जोशींकडे पाहिल्यावर येते. शेतकरी संघटनेचे प्रणेते दिवंगत शरद जोशी यांनी त्यांचं संपुर्ण आयुष्य शेतक-यांच्या हितासाठी वेचलं. 

Updated: Dec 26, 2015, 02:13 PM IST
मृत्यूनंतरही शेतक-यांच्या नेत्याची तळमळ कायम title=

मुंबई : नेता कसा असावा याची प्रचिती शरद जोशींकडे पाहिल्यावर येते. शेतकरी संघटनेचे प्रणेते दिवंगत शरद जोशी यांनी त्यांचं संपुर्ण आयुष्य शेतक-यांच्या हितासाठी वेचलं. 

मृत्यूनंतरही त्यांची शेतक-यांविषयीची तळमळ कायम राहिली. हीच तळमळ त्यांच्या इच्छापत्रातून दिसून येतीये. हायातभरातील स्वकष्टार्जित कमाईची विल्हेवाट लावतानाही शरद जोशींनी शेतक-यांच्या हिताचाच विचार केला. त्याची ही मनाला भिडणारी तळमळ त्यांच्या इच्छापत्रातून व्यक्त झालीये. 

या इच्छापत्रात शेतक-यांचा, सहका-यांचा, सेवेक-यांचा इतकच काय तर वाहनचालकाचाही विचार करण्यात आला असून त्यांच्यासाठी शरद जोशींनी लाखोंची रक्क्म देऊ केलीये. शरद जोशींच्या संपत्तीचा लेखाजोखा त्यांच्या इच्छेनुसार पुढे आलाय. 

गुरुवारी पवनारच्या नदीकाठी मोजक्या हितचिंतकांच्या उपस्थितीत प्रार्थनासभा झाली. त्यावेळी त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी रवी काशीकर यांनी शरद जोशींच्या इच्छापत्राबद्दल माहिती दिली.