मुंबई: सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची स्वतःचीच भूमिका निश्चित नाही. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला पाठिंबा देणार नाही असा खुलासा, शरद पवार यांनी केला आहे.
दादरी हत्याकांड, साहित्यिकांनी पुरस्कार परत करणं या आणि इतर प्रकरणांमुळे देशात असहिष्णू वातावरण वाढत असल्याचं पवार म्हणाले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.
पाहा पवारांची संपूर्ण पत्रकार परिषद -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.