शिवसेना-भाजप महायुतीत जागा वाटपाचा तिढा

शिवसेना-भाजप महायुतीमधील घटक पक्षांना जास्तीत जास्त ३० ते ३५ जागा सोडणार आहेत. मात्र ४ घटक पक्षांनी एकूण १३० पेक्षा जास्त जागांची मागणी केलीये. त्यामुळे...

Updated: Jul 29, 2014, 01:44 PM IST
शिवसेना-भाजप महायुतीत जागा वाटपाचा तिढा title=

मुंबई : शिवसेना-भाजप महायुतीमधील घटक पक्षांना जास्तीत जास्त ३० ते ३५ जागा सोडणार आहेत. मात्र ४ घटक पक्षांनी एकूण १३० पेक्षा जास्त जागांची मागणी केलीये. त्यामुळे घटक पक्षांची समजूत घालण्याची मोठी कसरत शिवसेना-भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना करावी लागणार आहे. 

महायुतीमध्ये महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने ३५ पेक्षा जास्त जागा, स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं ६० पेक्षा जास्त जागा, आठवले आरपीआय गटानं २० पेक्षा जास्त जागा आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी १० पेक्षा जास्त जागांची मागणी केलीये. त्यामुळे १६९ -११९ असा फॉर्म्युला असलेल्या सेना-भाजपला जागा वाटप करताना घटक पक्षाचे समाधान कसे करायचे असा पेच पडलाय. 

यासाठी सेना-भाजपने एक सूत्र बनवलंय. जिंकून येऊ शकणारा उमेदवार हेच जागा वाटपाचे मुख्य गणित असणार आहे. प्रत्येक जागेचा पक्का अभ्यास असलेल्या शिवसेना-भाजपला आरपीआय आणि मेटेंना हाताळणे काहीसे सोपे जाणार आहे. अगदी थोड्या जागांवर जानकर यांना पटवून देणे शक्य होणार असले तरी स्वाभीमान शेतकरी संघटनेची समजूत कशी घालायची याचं उत्तर शोधावं लागणार आहे. 

जागांची गणिते लक्षात घेतली तर घटक पक्षांना ३० ते ३५ पेक्षा जास्त जागा सोडणे शक्य नसल्याचं सेना -भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे. असं असलं तरी सोमवारची पहिली जागा वाटपाची चर्चा सकारात्मक झाल्याचं नेत्यांनी सांगितलं.

जागा वाटपात गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळण्यासाठी भाजप प्रयत्नशिल आहे. मात्र जागांमधील वा़टेकरी वाढल्यानं शिवसेनेला जास्त जागा सोडण्यास भाग पाडण्याचा मार्ग भाजप अवलंबणार आहे. त्यामुळे वाटाघाटीत जागा वाढवण्यापेक्षा कोण कोणाला जास्त जागा सोडण्यास भाग पाडतं यामध्येच सेना-भाजमध्ये खरी स्पर्धा रंगणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.