मुंबई : वांद्रे पूर्वमधील पोटनिवडणुकीत कॉंग्रेस उमेदवार नारायण राणे पिछाडीवर पडल्यावर शिवकार्यकर्त्यांनी जुहू येथील त्यांच्या घरासमोर फटाके फोडून जल्लोष केला. दरम्यान, तृप्ती सावंत यांचा विजय १९ हजार ८ मतांनी झाल्याचे समजताच कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन जल्लोष साजरा केला.
नारायण राणे यांच्या घरासमोर फटाके फोडल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते समोरासमोर आलेत. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद टळला गेला. अनेक शिवसैनिक राणे यांच्या घरासमोर जमू लागल्यामुळे तेथील सुरक्षा पोलीसांनी वाढविली आहे.
या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठ शिवसेना कार्यकर्त्यांना तेथून हटविण्याचे प्रयत्नही पोलिसांकडून करण्यात आलेत. फटाक्यांच्या माळा लावून आणि शिवसेनेच्या विजयाच्या घोषणा देऊन शिवसैनिकांनी आपला आनंद साजरा केला.
शिवसैनिकांनी राणे यांच्या घरासमोरील रस्त्यावर फटाक्यांच्या माळा लावला. त्याचबरोबर भगवा झेंडा फडकावून शिवसेनेच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. तर वाद्रा येथील मतमोजणी केंद्राबाहेरही शिवसैनिकांनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.