मुंबई : वांद्र्यातील महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष विजय बाळ चित्रे यांच्या घराची काही शिवसैनिकांनीच तोडफोड केली. ही तोडफोड झाली तेव्हा विजय चित्रे यांच्या पत्नी घरात एकट्याच होत्या.
तोडफोड करणारे घाणेरड्या शिव्याही देत होते असा आरोप चित्रेंच्या पत्नीनं केलाय. विजय चित्रे हे शिवसेनेचे नेते आहेत त्यामुळे तोडफोड करणारे हे खरे शिवसैनिक नाहीत असा दावा त्यांनी केलाय.
विजय चित्रेंचा मुलगा मनसेचा कार्यकर्ता आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा काही शिवसैनिकांसोबत वाद झाला होता. या वादातूनच ही तोडफोड करण्यात आली असावी असा संशय चित्रेंनी व्यक्त केलाय.