www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी देण्यात आलेला 100 कोटी रूपयांचा निधी टोलची भरपाई करण्यासाठी द्यावा, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे केली.
टोलच्या मुद्यावरून राज ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यावेळी अरबी समुद्रात बांधण्यात येणा-या शिवस्मारकाचा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केला.
शिवस्मारकासाठी यंदाच्या वर्षी 100 कोटींची तरतूद सरकारनं केलीय. त्याऐवजी ही रक्कम टोलची भरपाई करण्यासाठी सरकारनं द्यावी आणि शिवस्मारकासाठी पुढच्या वर्षी तरतूद करावी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. परंतु मुख्यमंत्र्यांनी ही मागणी अमान्य केल्याचं समजतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.