SHOCKING : इथे, व्हॉटसअपवरच मिळतो बांधकामांचा चाचणी अहवाल!

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कंत्राटदारांना कसं वाचवलं जातं याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. कंत्राटदारांना त्यांच्या बांधकाम नमुन्यांचा चाचणी अहवाल हवा तसा मिळवता येऊ शकतो, हे आता सिद्ध झालंय.

Updated: Sep 5, 2015, 12:30 PM IST
SHOCKING : इथे, व्हॉटसअपवरच  मिळतो बांधकामांचा चाचणी अहवाल! title=

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कंत्राटदारांना कसं वाचवलं जातं याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. कंत्राटदारांना त्यांच्या बांधकाम नमुन्यांचा चाचणी अहवाल हवा तसा मिळवता येऊ शकतो, हे आता सिद्ध झालंय.

नवी मुंबईतल्या एस के जी लॅबमध्ये अशा बनावट चाचण्या करुन दिल्या जात असल्याचं उघड झालंय. प्रत्यक्षात बांधकामासाठीच्या साहित्याची तपासणी करायची असल्यास, संबधित विभागाकडून सीलबंद पद्धतीने नमुने पाठवले जातात. 

मात्र, एस.के.जी लॅबकडून केवळ वॉट्स अपवर अर्ज मागवला जातो. नंतर एस.के.जी लॅब व्हॉटसअपवरच संबंधित विभागाला चाचणी अहवालही देते. 'आरपीआय'नं या गैरप्रकारांचा भांडाफोड केला आहे.

यासाठी दोन सप्टेंबरला बनावट कंस्ट्रक्शन कंपनी नावे एक अर्ज एसकेजी लॅबकडे पाठवला गेला. त्यावर कुठलीही शहानिशा न करता लगेचच दुसऱ्या दिवशी एसकेजी लॅबनं चाचणी अहवाल दिला. 

विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांचं मुंबईतलं सरकारी निवासस्थान वर्षा बंगला परिसरातलं बांधकाम आणि मंत्रालयातल्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या दालनाचं नुतनीकरण करणार असल्याचं या अर्जात म्हटलं होतं. 

याहूनही याच एसकेजी लॅबकडून कंत्राटदारांनी नमुने तपासून घ्यावेत अशी सक्ती, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांकडून कंत्राटदारांवर केली जात असल्याचंही समजतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.