मुंबई : हवामानाचा अंदाज वर्तवणारी खासगी संस्था स्कायमेटने नुकताच एक व्हिडीओ जारी केला आहे. हा व्हिडीओ स्कायमेटने बनवला आहे, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवर हा व्हिडीओ आहे, शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून रोखण्यासाठी हा व्हिडीओ असावा.
शेतकऱ्यांच्या दुष्काळामुळे आत्महत्या वाढत आहेत, यानंतर त्यांच्या मुलांच्या मनात नेमक्या काय भावना आहेत, निदान त्यांचा विचार व्हावा आणि हे सत्र थांबावं अशा अर्थाने हा व्हिडीओ आहे.
हवामानावर आधारीत पिक विम्यात अनेक ठिकाणी पर्जन्यमापकं लावण्यात आली आहेत, त्यात बहुतांश ठिकाणी स्कायमेटचीही पर्जन्यमापकं आहेत. यावरून शेतकऱ्यांची या कंपन्यांना किती काळजी आहे, हे पिक विम्याच्या परताव्यावरूनच कळणार आहे.
पाहा दुष्काळात होरपळलेल्या शेतकरी कन्येचं मन
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.