मुंबई : वांद्रे पूर्व मतदार संघात पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचा शिवसेना उमेदवार तृप्ती सावंत यांच्याकडून १९ हजार ८ मतांनी पराभव झाला. त्यानंतर सोशल मीडियावर राणे यांच्या पराभवाची चर्चा जास्तच रंगत आहे. राणेंनी निवडणूक का लढविली ते आता राणे यांनी काय करावे, असा सल्ला ही दिला गेलाय. राणेंची खिल्ली उडविण्यात आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेले जोक्स्
१. नियतीने न्याय दिला... मातोश्रीवरून बाळासाहेबांच्या आशीर्वादाने राजकीय कारकीर्दीला सुरुवात त्याच ठिकाणी राजकीय अंत..
२. शिवसेनेच्या कारकिर्दीतला महत्वाचा दिवस.
महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण देणारा दिवस.
राजकारणाचं एक वर्तुळ पूर्ण करणारा दिवस.
शिवसेनेच्या मुळावर ये' नाऱ्याला' मुळासकट ऊखडण्याचा दिवस.
साहेबांच्या अपमानाचा हिशेब चुकता करण्याचा दिवस.
होय गाडला_नारायण दिवस.
Vandre_East_Bye_Election
जय महाराष्ट्र ! जय शिवसेना !
३. आता ही अफवा कोणी पसरवली की. . . .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
वरवड़े ग्रामपंचायतीचे तिकीट मिळवण्यासाठी नारायण राणे दिल्लीला रवाना....
सोनियांच्या घराबाहेर भेटीच्या प्रतिक्षेत . . . .
३. ताजी बातमी राणे मुंबई महापालिका लढवणार राणे दिल्ली येथे सोनिया यांची भेट घेण्यास रवाना....
४. Breaking news
कणकवलीमधून राणेचे चिरंजीव नितेश राणे राजीनामा देणार आणि राणे पुन्हा निवडणूक लढवणार - Arvind Bhosale
५. माझ्या facebook and whatsapp च्या सर्व मित्र आणि मैत्रीणींनो कृपा करून 2 मिनिटे आपला
मोबाईल फोन बंद करून नारायण राणे यांच्या
राजकीय कारकीर्दीला आदरांजली
द्यावी...आणि ईश्वर त्यांना कोणतीही
निवडणूक न लढवण्याची बुद्धी द्यावी.
नारायण राणेंच्या आयुष्यावर कोण कधीच चित्रपट काढणार नाही. पडण्याची भिती, दुसरं काय?
५. अजून दोन तासांनी नारायण राणे यांचे नाव Limca Book of records मध्ये समाविष्ट होणार..
६. सहा महिन्यांत दोन ठिकाणी विधानसभेच्या दोन निवडणुकांत पराभूत होण्याची किमया साधणारे देशातले पहिले माजी मुख्यमंत्री ठरणार..
यानिमित्त राणे यांच्या स्वागताची सिंधुदुर्गात जोरदार तयारी ...
आता ही अफवा कोणी पसरवली कि, .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. दादा हैद्राबाद मधून निवडणूक लढवणार..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.