शाळेतील योग दिनाच्या सक्तीवर काही मुस्लिम संस्थांचा आक्षेप

 आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याच्या राज्य शासनाच्या सक्तीवर मुंबईतील मुस्लिम शिक्षण संस्थांनी आक्षेप घेतला आहे. शाळांमध्ये येत्या २१ जूनला योग दिवस साजरा केला जाणार आहे.

Updated: Jun 3, 2015, 10:53 PM IST
 शाळेतील योग दिनाच्या सक्तीवर काही मुस्लिम संस्थांचा आक्षेप title=

मुंबई :  आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याच्या राज्य शासनाच्या सक्तीवर मुंबईतील मुस्लिम शिक्षण संस्थांनी आक्षेप घेतला आहे. शाळांमध्ये येत्या २१ जूनला योग दिवस साजरा केला जाणार आहे.

योग दिवस म्हटला की सूर्यनमस्कार करणे आले. मात्र, मुस्लिम धर्मात नमाज अदा करतेवेळी केवळ अल्ला समोरच वाकून नमस्कार करण्याची पद्धत आहे. 

अल्ला शिवाय इतर कोणासमोरही वाकून नमस्कार करणे मुस्लिम धर्म सांगत नाही. यामुळे योग दिवस साजरा करण्याच्या शासनाच्या सक्तीवर आक्षेप असल्याचे मुंबईतील जमात-ए-इस्लामी हिंद शिक्षण संस्थेचे सचिव मोहम्मद झहूर अहमद यांनी म्हटलंय. 

या विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचेही काही मुस्लिम शिक्षण संस्थांनी ठरविले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.