मुंबई : शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेनं घेतलेल्या 'पे अँड पार्क'च्या प्रायोगिक प्रकल्पाला राज्य सरकारनं अंतरिम स्थगिती दिलीय.
नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी स्थगितीचे आदेश दिले आहेत. ए वॉर्डमध्ये रस्त्यांवर पे अँड पार्कचा प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवण्यात येत होता. मात्र, नागरिकांच्या तक्रारीनंतर भाजप आमदार राज पुरेहित यांनी विरोध दर्शवला होता.
त्यामुळं याला अंतरिम स्थगिती देण्यात आलीय. या प्रकरणी महापालिका आयुक्तांना सुनावणी घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेनं काही दिवसांपूर्वी रस्त्यांवर पार्कींग प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, भाजपकडे असलेल्या नगरविकास खात्यानं या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळं पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेतला वाद उफाळून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.