मुंबई : लोकल सेवेवरील ताण या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गुरूवारी चर्चा केली. या बैठकीत लोकल सेवेवर येणारा ताण टाळण्यासाठी कार्यालयीन कामांच्या वेळा बदलाव्यात, अशी सूचना सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
कार्यालयात जाण्यासाठी एकाच वेळी अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणांहून बाहेर पडत असल्याने रेल्वेवरील ताण वाढतो. त्यामुळे हा ताण कमी करायचा असेल तर कार्यालयीन वेळांमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
कार्यालयीन वेळेत बदल झाल्यास, ही उपाययोजना अंमलात आणली गेल्यास, रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी कमी होऊन अपघातांचे प्रमाणही घटेल, असे मत प्रभू यांनी व्यक्त केले. याशिवाय, प्रवाशांवरील ताण कमी करण्यासाठी सीएसटी ते पनवेल आणि चर्चगेट ते विरार मार्गावर सहापदरी उन्नतमार्ग बांधण्याचे आश्वासनही यावेळी रेल्वेमंत्र्यांनी दिले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.