हे नऊ जण आहेत महाराष्ट्राचे स्वच्छतादूत!

सिने अभिनेता अभिषेक बच्चन, नेमबाज अंजली भागवत आणि नीता अंबानी यांच्यासहीत नऊ जण महाराष्ट्राचे स्वच्छता सदभावना दूत असणार आहेत. राजभवन आणि मंत्रालयात गुरुवारी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याद्वारे स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ही घोषणा करण्यात आलीय. 

Updated: Oct 17, 2014, 11:56 AM IST
 हे नऊ जण आहेत महाराष्ट्राचे स्वच्छतादूत! title=

मुंबई : सिने अभिनेता अभिषेक बच्चन, नेमबाज अंजली भागवत आणि नीता अंबानी यांच्यासहीत नऊ जण महाराष्ट्राचे स्वच्छता सदभावना दूत असणार आहेत. राजभवन आणि मंत्रालयात गुरुवारी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याद्वारे स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ही घोषणा करण्यात आलीय. 

महाराष्ट्रातील जनता ओळखत असलेल्या नामी व्यक्तींचा या स्वच्छतादूतांमध्ये समावेश आहे. यामध्ये आदित्य बिर्ला ग्रुपच्या संचालिका राजश्री बिर्ला, उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी आणि इंडियन सुपर लीगच्या आयोजन समितीच्या अध्यक्ष नीता अंबानी, नेमबाज अंजली भागवात, महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी, समाज सुधारक दत्तात्रण नारायण ऊर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी, अभिनेता अभिषेक बच्चन, मकरंद अनापुरे आणि गायिका सुनिधि चौहान यांच्यासहीत रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावल्यानंतर जिद्दीने उभ्या राहिलेल्या मोनिका मोरे यांचा सामावेश आहे. हे सगळेच जण राज्यात स्वच्छता जागरुकता पसरवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. 

या सगळ्यांचे प्रयत्न समाजात लोकांना साफ-सफाईसाठी प्रेरित करतील, असं राज्यपाल राव यांनी म्हटलंय. देशातील सर्वात स्वच्छ राज्य बनविण्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्रात भरपूर काही गोष्टी कराव्या लागतील, असंही त्यांनी म्हटलंय.

राज्यपाल विद्यासागर राव स्वच्छता अभियानासाठी स्वत: १८ ऑक्टोबर रोजी जेजे हॉस्पीटलमध्ये जाणार आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.