www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सर्वात जास्त भ्रष्टाचारी खातं कोणतं, हा प्रश्न मनात आला तर उत्तर मिळतं पोलीस खातं. आणि ही बाब स्पष्ट होते ती, लाचलूचपत प्रतिबंध विभागाच्या आजवरच्या आकडेवारीवरुन. पोलीस खातं किती भ्रष्ट आहे याचा आणखी एक नमुना समोर आलायं तो मुंबईतील मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्रात. त्याठिकाणी सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचं स्टिंग ऑपरेशन करण्यात आलंय. विशेष रिपोर्ट "पोलिसांना ट्रेनिंग भ्रष्टाचाराचं."
का आहे पोलीस खातं भ्रष्टाचारी?, मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्रात सुरु आहे सर्रास भ्रष्टाचार, प्रशिक्षण केंद्रातच दिले जाते भ्रष्टाचाराचं ट्रेनिंग, पोलीस पैसे देऊन होतायेत प्रशिक्षणात पास
पोलीस दलात भरती व्हायचं असेल तर, पैशांशिवाय काम होतं नाही हे जगजाहीर आहे. पण, पैसे भरुन भरती झाल्यानंतर कामावर रुजू होईपर्यंत पुन्हा पैसे द्यावे लागतात. तुम्हाला हे खरं वाटत नसेल ना..? पण, हा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय. मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलिसांना मुळात ट्रेनिंगच दिलं जातं भ्रष्टाचार कसा करायचा याचं. अगदी ५० रुपयांपासून ते लाख रुपयांपर्यंतचा भ्रष्टाचार या प्रशिक्षण केंद्रात सुरु आहे, हे एका स्टिंग ऑपरेशनद्वारे जगासमोर आलंय.
मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस भरती निवड झालेल्या मुलांना ट्रेनिंग देऊन त्यांची कर्तव्ये शिकवली जातात. पण, कर्तव्य शिकवताना त्यांना भ्रष्टाचाराचं ही ट्रेनिंग दिलं जातं, हे याचं पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एका जागरूक अधिकाऱ्यांने स्टींग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणलय. हफ़्ता कसा घ्यायचा, चिरीमिरी हा कसं सोडायचं नाही छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टीसाठी देवाणघेवाणीचं धोरण कसं आखायचं हे सर्व या स्टींग ऑपरेशनमधून समोर आलंय.
प्रशिक्षणार्थींकडून कोणत्या कारणांसाठी पैसे उकळले जातात?
मिलेट्री रिटायर होऊन आलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी मैदानी परेड नको असेल तर प्रत्येक महिन्याला हजार रुपये लाच देऊन मेस, कॅन्टीन, कारपेंटर किंवा इलेक्ट्रिकल स्टाफ म्हणून ठेवलं जातं. पोलीस भरतीतून निवडून आलेला प्रशिक्षणार्थी रजेवर गेला असेल आणि त्याला रजा वाढवून पाहिजे असल्यास प्रत्येक दिवसापोटी हजार रुपये लाच द्यावी लागते.
- प्रशिक्षणार्थींमध्ये मारामारी झाल्यास कारवाईपासून वाचण्यासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थींला 500 रुपये लाच द्यावी लागते.
- बंदोबस्तासाठी आपल्या जिल्ह्यात जायचं असेल तर, प्रत्येकी 300 रुपये लाच द्यावी लागते.
- परेडला उशीर झाल्यास कारवाई टाळण्यासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थींला 50 रुपये लाच द्यावी लागते.
- कॅम्पमधून बाहेर जाण्यासाठी 500 ते 5 हजार रुपये रुपये लाच द्यावी लागते.
- मद्यपान करताना एखादा प्रशिक्षणार्थी आढळल्यास त्याला 500 ते 5 हजार रुपये लाच द्यावी लागते.
महासंचालक आणि अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) यांना पत्राद्वारे 22 ऑक्टोंबर 2013 या दिवशी कळवण्यात आली होती. त्यांनतर भ्रष्टाचाराची चौकशी सुरु करण्यात आली. पण, ज्या अधिकारा-यांनी हा भ्रष्टाचार केलाय, त्यांची मरोळ प्रशिक्षण केंद्रातून बंदली न करताच ही चौकशी करण्यात येतेय. त्यामुळे ही चौकशी किती निःपक्षपातीपणे केली जातेय, हे वेगळं सांगायला नको...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.