www.24taas.com, मुंबई
गॅस टँकर उलटल्यानं झालेल्या अपघातमुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक विस्कळीत झालीय. टँकर अपघातामुळं लागलेली आग विझवण्यासाठी किमान १८ तास लागणार असल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. त्यामुळं ज्या प्रवाशांना ईस्टर्न हायवेनं प्रवास करायचा आहे त्यांना आज विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.
काही महत्त्वाच्या सूचना
• `द बर्निंग टँकर`मुळे हायवेवर मेगाब्लॉक
• ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेनं प्रवास करणे शक्यतो टाळा
• चेंबूरहून – मानखूर्दकडे जाणारी वाहतूक ठाण्याकडे वळवण्यात आलीय.
• आवश्यकता असेल तरच वाहन घराबाहेर काढा
• आजचा दिवस शक्यतो रेल्वेचा पर्याय स्वीकारा
कसा घडला अपघात
गॅस टँकर मानखुर्दजवळ फ्लायओव्हरवरुन कोसळल्याने ही आग लागली. या आगीत एक जण ठार तर २०हून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. या टँकरमध्ये जवळपास २० टन एलपीजी गॅस असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळं मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १५ हून अधिक अग्निशमनच्या गाड्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलंय. ही आग इतकी भीषण आहे की ती आटोक्यात आणण्यासाठी २० तासाहून अधिक काळ लागण्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय.