नवी मुंबई : नवी मुम्बई महापालिकेत ठोक मानधनावर काम करणारे ८०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंडे यांनी घेतला आहे.
नियमांना डावलून ही भरती केली असल्याने हा निर्णय घेतल्याचा दावा आयुक्तांनी केलाय. या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत गोंधळ घातला.
आयुक्तांनी याबबत परिपत्रक काढलं असून भविष्यातली कामगार भरती ही सरकारच्या नियमांना धरून आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
सध्या काम करत असलेले कर्मचारी हे अनुभवी असल्याने आणि प्रकल्पग्रस्त असल्याने त्यांना कामावरून काढून टाकणं चुकीचं असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं. कर्मचारी भरती करताना सरकारच्या नियमानुसार जाहिरात देऊन, परीक्षा आणि मुलाखतीमधून भरती करणं अपेक्षित होतं. मात्र, ही भरती नियमबाह्य झाली असल्याने हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं तुकाराम मुंडे यांनी सांगितलं.