`हे राज्य यावे` ही तर बाळासाहेबांची इच्छा! - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामना या वृत्तपत्राला प्रदीर्घ मुलाखत दिली. शिवसेनेत बेबंदशाही येऊ देणार नसल्याचं खणखणीतपणे त्यांनी सांगितलं.

Updated: Jan 29, 2013, 09:44 AM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामना या वृत्तपत्राला प्रदीर्घ मुलाखत दिली. शिवसेनेत बेबंदशाही येऊ देणार नसल्याचं खणखणीतपणे त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी शिवसेनेची दिशा, धोरणे, योजना याबाबत सविस्तर उत्तरे दिली. तसंच अजित पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं.
- शिवसेना मजबूत आहे शिवसैनिकही तसाच कडवट आहे! कोणीही नाराज नाही शिवसेना यापुढेही बाळासाहेबांच्या मार्गाने पुढे जाईल असं म्हणतं उद्धव ठाकरे यांनी कोणीही नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे.
- तर उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत विचारले असता. त्यांनी सांगितले की, `ज्या व्यासपीठावरुन त्यांनी शिवतीर्थ गाजवलं ती जागा शिवसेनाप्रमुखांचीच.. त्यांचे स्मारक हे फार भव्यदिव्य असायला पाहिजे, पण जर करणार असाल तर.` असे म्हणत उद्धव ठाकरेंनी स्मारकाबाबतही आपलं मत व्यक्त केलं.
- शिवसेनेत बेबंदशाही येऊ देणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जणू काही इशाराच दिला आहे. `महाराष्ट्रात सत्तांतर अटळ आहे, असं म्हणत त्यांनी राज्यातील सरकारवरही ताशेरे ओढले.
- तसेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. `दुर्दैवाने आपल्या देशाला गृहमंत्रीच नाही आहे. चुकून पाकिस्तानी मंत्रिमंडळातला मंत्री आपल्याकडे गृहमंत्री झाला आहे.` अशी बोचरी टीका ही उद्धव ठाकरेंनी केली आहे.
- तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. `पाण्याच्या बाहेर मासा जसा तडफडतो तसे राजीनाम्यानंतर अजित पवारांचे झाले.` `अत्यंत नामुष्कीने खालच्या पातळीवर जाऊन अजित पवार खुर्चीवर बसले.` अजित पवारांना टार्गेट करीत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या राजीनामा नाट्यवर ताशेरे ओढले.

- शिवसेनेतून कोणी येत असेल तर खुशाल घेऊन जा `म्हणा नांदा सौख्यभरे` जे कोणी चाळीस काय चारशे येत असले तरी घेऊन जा, एक आला तरी सत्कार करीन. असे सांगून बंडखोरीच्या विचारात असणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी इशाराच दिला आहे.