बडे उद्योगपती, राजकारणी आणि धनदांडग्यांच्या बंगल्यांवर हातोडा

रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर असलेल्या दीडशे पेक्षा जास्त बंगल्यांवर अखेर कारवाई होणार आहे. बडे उद्योगपती, राजकारणी आणि धनदांडग्यांचे बंगले अलिबाग समुद्रकिनारी सीआरझेडचे उल्लंघन करून उभे आहेत. त्यावर पर्यावरण मंत्र्यालयाने आक्षेप घेत कारवाईचे निर्देश दिलेत.

Updated: May 21, 2015, 11:24 PM IST
बडे उद्योगपती, राजकारणी आणि धनदांडग्यांच्या बंगल्यांवर हातोडा title=

मुंबई : रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर असलेल्या दीडशे पेक्षा जास्त बंगल्यांवर अखेर कारवाई होणार आहे. बडे उद्योगपती, राजकारणी आणि धनदांडग्यांचे बंगले अलिबाग समुद्रकिनारी सीआरझेडचे उल्लंघन करून उभे आहेत. त्यावर पर्यावरण मंत्र्यालयाने आक्षेप घेत कारवाईचे निर्देश दिलेत.

सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या या बंगल्यांवर हातोडा चालवण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. येत्या दोन महिन्यात ही कारवाई पूर्ण करण्याचे आदेशही कदम यांनी दिले आहेत. 

बडे उद्योगपती आणि राजकारण्यांच्या बंगल्यावर हातोडा चालवताना इथल्या स्थानिक कोळी बांधवांच्या बांधकामांना मात्र संरक्षण दिले जाणार आहे. पर्यावरण मंत्र्यांच्या या घोषणेनंतर दोन महिन्यांच्या आत प्रत्यक्ष कारवाई होते का, याकडं झी 24 तासचं बारीक लक्ष असणार आहे. 

ज्या बंगल्यांवर हातोडा चालवला जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे खासदार यांचाही समावेश आहे.

> यांच्या बंगल्यांवर हातोडा
> शिवसेना खासदार राजन विचारे,
> उद्योगपती रतन टाटा
> नोअेल टाटा
>  अजय पिरामल
> बी. डी. नरीमन - वरसोली, अलिबाग
> नोझर रुसी वाडिया
> मुकुल मुरली देवरा
> नाझनीन झवेरी
> खटाव यांचे अलिबाग इथे ४ बंगले

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.