मीठाचे अफवा पसरविण्याचे खरे कारण काय?

मोदी सरकारने ५०० आणि १००० हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णयानंतर या योजनेला गालबोट लागावे या उद्देशातून काही समाज कंटकांनी मिठाचा तुटवडा झाल्याची अफवा पसरविण्यात आली असल्याचे प्रथमदर्शी कारण यात दिसत आहे. 

Updated: Nov 11, 2016, 10:56 PM IST
मीठाचे अफवा पसरविण्याचे खरे कारण काय?  title=

मुंबई : मोदी सरकारने ५०० आणि १००० हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णयानंतर या योजनेला गालबोट लागावे या उद्देशातून काही समाज कंटकांनी मिठाचा तुटवडा झाल्याची अफवा पसरविण्यात आली असल्याचे प्रथमदर्शी कारण यात दिसत आहे. 

का पसरली असेल अफवा...

गेल्या दोन तीन दिवसापासून बँका आणि एटीएम बंद असल्याने आपल्याकडील सुटे पैस जमा करून ठेवले. पण लोकांकडील सुटे आणि १०० रुपयांच्या खालील नोटा बाजारात याव्यात यासाठी ही अफवा पसरविण्यात आल्याचे दिसत आहे. 

मिठाच्या दरावरून शंका.

अफवा पसरल्यानंतर मिठाचा वाढीवर दर जास्त जास्त २०० ते ४०० रुपये किलो आहे. तो ५०० रुपयांच्या वर नाही. त्यामुळे लोकांकडील सुट्टे पैसे काढण्यासाठी काही समाज कंटकांनी ही अफवा पसरवली असल्याची शंका निर्माण होत आहे. 

काही विशिष्ट समाजाकडून खरेदी...

ही अफवा काही विशिष्ट समाजामध्ये मोठ्या प्रमाणात पसऱली आहे. या समाजात अशिक्षित लोकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे व्हॉट्सअॅप, फेसबूक सारखे माध्यम नाहीत अशामध्ये माऊथ टू माऊथ ही अफवा पसरली आहे.  

पाकिस्तानातून अफवा पसरल्याची शक्यता...

भारतातून मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला मिठाचा पुरवठा होता. त्यामुळे मोदींनी केलेल्या काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकनंतर ते आता पाकिस्तानातील मीठ बंद करतील आणि पाकिस्तानात मोठा मिठाचा तुटवडा होईल अशी शक्यता येथील कट्टरपंथीयांनी व्यक्त केली असेल, त्यातूनच हा अफवेचा किडा वळवळला असण्याची शक्यता निर्माण होत आहे.