www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेचा आज वर्धापन दिन कार्य़क्रम झाला. यानिमित्त दोन दिवसीय शिबीराचं आयोजन केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिबीरामध्ये मांडलेलं व्हिजन सांगितलं. महायुतीचं सरकार आल्यावर मुंबईसाठी काय करणार याबद्दल उद्धव ठाकरेंनी माहिती दिली.
मात्र मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांनी बोलण्यास नकार दिला. मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय महायुतीत चर्चा झाल्यानंतरच होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच भाजपला जागा वाढवून हव्यात त्याबद्दल विचारलं असता, अजून माझ्यासोबत कोणीही जागावाटपाबद्दल बोललं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 18 महत्त्वाचे मुद्दे
> मात्र त्याबाबत निर्णय घेतांना कोणतीही प्रथा पडू नये यासाठी प्रयत्न करणार
> कॅम्पा कोलामध्ये श्रीमंतांबरोबर सामान्यही आहेत - उद्धव
> शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देणार
> मुंबई प्रमाणे राज्यासमोर विकासाचं मॉडेल ठेवणार
> जागावाटपाबद्दल माझ्याशी अजून कोणी बोललं नाही
> अजून कोणीही जागा वाढविण्याची मागणी केली नाही
> मला निर्णय घ्यायची घाई करण्याची गरज वाटत नाही
> मी अजून याबद्दल विचार केला नाही- उद्धव
> शिबीरात उद्धव ठाकरेंनी आपलं व्हीजन मांडलं
> माझे नाही, आपले सरकार येणार - उद्धव ठाकरे
> व्हर्च्युअल क्लास रूम यंत्रणा राज्यात राबवणार
> महायुतीतील सर्वांना एकत्र घेऊन मगच मुख्यमंत्र्यांचा निर्णय
> कोळीवाडयाचा विकास महायुतीचं सरकार करणार
> मुंबई कोळीवाडाला धक्का न लावता कोस्टल रोड बनवणार
> `मी व्यक्तीगत स्वप्न घेऊन जगणारा नाही`
> डॉ. अमोल कोल्हे यांना शिवसेनेचं उपनेते पद
> शिवसेनेचा आज वर्धापन दिन
> पावसाळा संपताच निवडणुका आहेत, आम्ही तयार आहोत. पण गोपीनाथ मुंडेंची उणीव भासेल
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.